

Maharashtra students travelling from Pune to Delhi for the proposed CJP protest were detained at Itarsi railway station.
esakal
महाराष्ट्रातून दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरवून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे प्रकरण आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जबलपूर येथील उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून, ताब्यात घेतलेल्या संबंधित व्यक्तींना न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने त्यांना सादर करावे किंवा सोडून द्यावे, अशी भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.