Pune : स्वच्छ पुण्यासाठी नवे पाऊल! पुनर्वापर होऊ शकणाऱ्या वस्तू येथे करा जमा

औंध बाणेर जुने औंध क्षेत्रीय कार्यालय
 ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’
‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’sakal

पुणे : केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ या मोहिमेअंतर्गत पुनर्वापर होऊ शकणाऱ्या जुन्या वस्तू जमा करण्यासाठी महापालिकेने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १७ ठिकाणी केंद्र तयार केले आहेत. ‘रिड्यूस, रियूज आणि रिसायकल’ (आर.आर.आर.) या नावाने संबंधित केंद्र असून त्यामध्ये जुने कपडे, मुलांची खेळणी, भांडी यांसारख्या वस्तू जमा करता येणार आहेत.

पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या मदतीने ‘स्वच्छ भारत मिशन २.०’ अंतर्गत ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये ‘आर.आर.आर.’नुसार पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.

त्यामध्ये जुनी पुस्तके, पेपर, मॅगझीन, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक, थर्माकोल, फर्निचर, काच, काचेच्या बाटल्या, भांडी, ई कचरा, जुनी कपडे, पादत्राणे यासह इतर वस्तू गोळा करण्यात येणार आहेत. पर्यावरणपुरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत बाराशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत १७ ठिकाणी विविध सोसायट्या, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मोकळी मैदाने, बाजारपेठा या ठिकाणी ‘आर.आर.आर.’ केंद्र तयार करण्यात आली आहेत. तेथे नागरिकांना आपल्याकडील जुन्या वस्तू देता येणार आहे.

  • क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘आर.आर.आर.’ केंद्राचे नाव

  • येरवडा, कळस, धानोरी रोड नं १०, डी, विद्यानगर

  • ढोले पाटील रोड बर्निंग आरोग्य कोठी

  • औंध बाणेर जुने औंध क्षेत्रीय कार्यालय

  • शिवाजीनगर घोले रोड हिरवाई हजेरी कोठी, कमला नेहरू पार्क

  • कोथरूड-बावधन मयूर कॉलनी आरोग्य कोठी

 ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’
Pune Pride March : प्राईड मार्चमध्ये सहभागी होणार महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, 'हे' आहे कारण
  • धनकवडी - सहकारनगर तीन हत्ती चौक हजेरी कोठी, शरदचंद्र पवार उद्योग भवन

  • सिंहगड रोड सनसिटी आरोग्य कोठी

  • वारजे कर्वेनगर नादब्रह्म आरोग्य कोठी

  • हडपसर मुंढवा मगरपट्टा चौक, मेगा सेंटरजवळ

  • कोंढवा येवलेवाडी पेशवे तलाव कोठीजवळ

  • वानवडी रामटेकडी शिवरकर उद्यान, वानवडी

  • कसबा विश्रामबागवाडा इंद्रधनुष्य

  • भवानी पेठ मनपा कॉलनी नं.८, घोरपडी पेठ

  • बिबवेवाडी व्हीआयटी आरोग्य कोठी, अप्पर

 ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’
Nagpur : रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादी दावा ठोकणार ; दोन्ही काँग्रसमध्ये बिनसणार

२७ टन जुन्या वस्तू जमा

  • शहरातील नागरिकांनी आत्तापर्यंत २७ टन जुन्या वस्तू दिल्या आहेत

  • जुन्या वस्तूंमध्ये कपडे ५६ टक्के, ई वेस्ट ८ टक्के, पुस्तके ९ टक्के

  • २७ टक्के खेळणी, पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश

  • या वस्तू संकलित करून त्यांचे नूतनीकरण करणे, नवीन उत्पादन करणे किंवा पुनर्वापर अशा कारणांसाठी वापर होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com