esakal | pune | सीएनजी गॅसच्या दरात पुन्हा किलोमागे अडीच रुपये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

देशात सीएनजी दरवाढीचा भडका

पुणे : सीएनजी गॅसच्या दरात पुन्हा किलोमागे अडीच रुपये वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅसदराच्या वाढीनंतर आता सीएनजी गॅस दरातही वाढ झाली आहे. तेरा दिवसात बुधवारी दुसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे तेरा दिवसांपूर्वी असलेल्या या गॅसच्या प्रति किलो दरात आता आणखी २ रुपये ६० पैशांनी वाढ झाली आहे. ही नवी दरवाढ बुधवारी (ता.१३) मध्यरात्री बारा वाजल्यापासून लागू करण्यात आली आहे. या वाढीमुळे सीएनजी गॅसच्या ग्राहकांना आता प्रति किलोला ६२ रुपये १० पैसे मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा: IPL 2021: KKR ने केली 'दिल्ली' काबीज; CSK शी खेळणार फायनल!

याआधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सीएनजी गॅसचा प्रति किलोचा दर हा ५७ रुपये ५० पैसे होता. यामध्ये १ आॅक्टोबर २०२१ ला प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ होऊन त्याचा नवा दर हा ५९ रुपये ५० पैसे झाला होता. त्यात आता आणखी प्रति किलोमागे २ रुपये ६० पैशांनी वाढ झाली आहे. ही नवी दरवाढ बुधवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून लागू होणार असल्याचे आॅल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.

loading image
go to top