
पुणे : सीएनजी (CNG) पंपावर दुचाकीला गॅस भरताना एका कर्मचाऱ्याचा मोठा अपघात झाला आहे. गॅस भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचे नोझल उडून त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या दुर्दैवी घटनेत संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा डावा डोळा कायमचा गमवावा लागला आहे. ही घटना पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.