Pune Cold : शहरात थंडीचा कडाका कायम; सलग चौथ्या दिवशी पारा १० अंशांच्या खाली

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी पारा १० अंशांच्या खाली कायम आहे. त्यात पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
Pune Cold
Pune Coldsakal
Summary

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी पारा १० अंशांच्या खाली कायम आहे. त्यात पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

पुणे - शहरात सलग चौथ्या दिवशी पारा १० अंशांच्या खाली कायम आहे. त्यात पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शहरात थंडीचा कडाका तूर्तास असाच जाणवणार आहे.

गुरुवारी (ता. १२) शहरात ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सरासरीपेक्षा तापमानात ३ अंशांनी घट झाली होती. एकूण जिल्ह्यातील स्थिती पाहता पाषाण, एनडीए, हवेली, तळेगाव, शिरूर, लोणावळा, आंबेगाव आणि माळीण येथे ही पारा ८ ते ९ अंशांच्या दरम्यान नोंदला गेला. शहरात पुढील दोन दिवस थंडीची हुडहुडी कायम राहणार आहे. शनिवारपर्यंत (ता. १४) शहरात किमान तापमान ९ अंशांच्या दरम्यान असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला असून त्यानंतर तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा गारठला -

राज्यात बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली घसरल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारठा चांगलाच वाढला आहे. गुरुवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे ५.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर धुळे, पुणे, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद येथे ही पारा १० अंशांच्या खाली होता. राज्यात किमान तापमान हे सरासरीपेक्षा १ ते ५ अंशांनी खाली घसरले होते. कोकण वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे शुक्रवारी (ता. १३) मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता आहे.

शहरात मागील चार दिवसांपासून पारा सरासरीपेक्षा खाली

वार - किमान तापमान (अंश सेल्सिअस)

सोमवार (ता. ९) - ८.६

मंगळवार (ता. १०) - ७.४

बुधवार (ता. ११) - ८.१

गुरुवार (ता. १२) - ८.३

येथे पारा १० अंशांच्या खाली -

निफाड - ५.५

धुळे - ६.२

पुणे - ८.३

जळगाव - ७

नाशिक - ९.२

औरंगाबाद - ९.४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com