खेड-शिवापूर टोलनाका शिरवळ हद्दीत हालवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

खेड-शिवापूर येथील टोलनाका भोर हद्दीच्या पुढे हलविण्यात यावा. तसेच, महामार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मुख्य व्यवस्थापकांना दिल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी "एनएचएआय'ला पत्र पाठविले आहे.

पुणे - खेड-शिवापूर येथील टोलनाका भोर हद्दीच्या पुढे हलविण्यात यावा. तसेच, महामार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मुख्य व्यवस्थापकांना दिल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी "एनएचएआय'ला पत्र पाठविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थानिकांना भुर्दंड
दरम्यान, पुणे-सातारा महामार्गावरिल या टोलचा भोर, वेल्हा, पुरंदर आणि हवेली तालुक्‍यांतील नागरिकांकडून सर्रास वापर होतो. या महामार्गाची कामे प्रलंबित असूनही येथे टोल वसुली केली जाते. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या कारणास्तव टोल नाक्‍यावर अनेक आंदोलने झाली आहेत.

तीन नेते ठरवणार पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष!

वेळोवेळी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी हा टोल नाका शिवापूर येथून हटवून शिरवळ हद्दीत सुरू करावा. तसेच, हा टोल नाका भोरच्या हद्दीबाहेर हलविला जात नाही तोपर्यंत एमएच-12 आणि एमएच-14 या वाहनांकडून टोल घेऊ नये, अशी मागणी केली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 'एनएचएआय'ला पत्र पाठवून वरील आदेश दिले आहेत. 

संग्राम थोटपेंनी घेतली गडकरींची भेट
खेड-शिवापूर टोल नाका भोर हद्दीच्या बाहेर हलविण्यात यावा, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. या संदर्भात दोन दिवसांत माहिती मागविण्यात येईल, असे आश्‍वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती थोपटे यांनी दिली. 

खेड-शिवापूर टोल नाका भोर हद्दीच्या बाहेर स्थलांतरीत करण्याबाबत "एनएचएआय'ला पत्र दिले आहे. त्यावर "एनएचएआय'ने योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune collector demand letter to shift khed shivapur toll plaza