

Mahesh Lonkar Of Pune Collects 1200 Rare Flashlights Including Vintage And World War Models Recognized By Har Ghar Museum
sakal
पुणे : कागद जाळण्याइतकी ताकद असलेली टॉर्च, महायुद्धात वापरलेली टॉर्च, पेनच्या आकाराची, बाटलीसारखी, सोन्याचा मुलामा असलेली टॉर्च... अशा एक हजार २०० हून अधिक दुर्मीळ फ्लॅशलाइट्सचा संग्रह महेश लोणकर यांच्याकडे आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाची नुकतीच केंद्र सरकारच्या ‘हर घर म्युझियम’ उपक्रमातून दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमासाठी तयार केलेल्या विशेष व्हिडिओमध्ये लोणकर यांच्या संग्रहाची आणि त्यांच्या टॉर्चप्रेमाची कहाणी मांडली आहे.