Breaking : ससून रुग्णालयात 'इतके' ऑक्‍सिजन बेडस्‌ उपलब्ध होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्‍सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात येत्या मंगळवारपर्यंत १७५ खाटा उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी (ता.२) दिली. 

जिल्हाधिकारी राम यांनी रविवारी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, विभाग प्रमुख प्रा. आरती किणीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

यंदा 'रक्षाबंधन' होणार ऑनलाईन; कोरोनाने बदलल्या सणांच्या प्रथा!

ऑक्‍सिजन पाइपलाइन, लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजन टॅंक, स्थापत्य दुरुस्त्या, विद्युत दुरुस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी कामांची पाहणी त्यांनी यावेळी केली. ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेशही त्यांनी दिले. ससून रुग्णालयात मंगळवार (दि.४) पर्यंत १७५ ऑक्‍सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील, तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील. ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

ससून रुग्णालयातील इन्फोसिस, डेव्हिड ससून, पेडियाट्रीक, जेकब ससून या वॉर्डात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या कामासाठी चार कोटी दोन लाख रुपये खर्च येणार असल्याचे ही राम यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Collector Naval Kishore Ram informed that 325 oxygen beds will be available in Sassoon Hospital