यंदा 'रक्षाबंधन' होणार ऑनलाईन; कोरोनाने बदलल्या सणांच्या प्रथा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोनामुळे बहीण-भाऊ घरातूनच हा सण साजरा करतील, असे चित्र आहे. 

बालेवाडी (पुणे) : हिंदू धर्मामध्ये 'रक्षाबंधन 'या सणाला 
विशेष महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे हा सण बहीण-भावाच्या अतुट प्रेमाची आठवण करून देणारा सण होय. या दिवशी बहीण भावाकडे जाऊन, आवर्जून भावाला राखी बांधते, पण यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडेच लॉकडाऊन सुरू आहे. 

शहरातील अनेक भाग हे सील केले असल्यामुळे या वर्षी बहिणींना रक्षाबंधनसाठी आपल्या भावाकडे जाता येणार नाही. त्यामुळे यावर्षी प्रसारमाध्यमांच्याद्वारेच भावाला शुभ संदेश पाठवणे, तसेच मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून, बहिणी भावाला ओवाळणार, शुभेच्छा देणार आहेत. तर भावाकडून हक्काची मिळणारी ओवाळणीसुद्धा यावर्षी ऑनलाईनच मिळेल, असे चित्र आहे.

मैत्रीत आला दुरावा; स्टोरी काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडची!​

यासाठी अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी प्रसारमाध्यमंवरून त्यांच्या जाहिराती दिल्या आहेत. या व्यावसायिकांनी तयार केलेल्या राखी, गोड मिठाई, चॉकलेट, एखादा छानसा संदेश असे बॉक्स तयार केले आहेत आणि ऑनलाइन पद्धतीने ते जिथे पाहिजे, तिथे पोहचवण्याची व्यवस्था केलेली आहे. तर ज्यांचे भाऊ परदेशी आहेत त्यांनी पोस्टातून किंवा कुरिअरने खूप दिवस अगोदरच राख्या पाठवल्या आहेत, पण त्या वेळेत मिळणार की नाही अशी धाकधूक बहीण-भावांच्या मनात आहे. कोरोनामुळे बहीण-भाऊ घरातूनच हा सण साजरा करतील, असे चित्र आहे. 

'एसटी'च्या पाया पडणाऱ्या कंडक्टरचा फोटो व्हायरल; काय आहे यामागचे कारण?

'रक्षाबंधन' या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणामध्ये येणाऱ्या 'नारळी पौर्णिमे'च्या दिवशी किंवा वाढत्या दिवशीची (खांड तिथी) पौर्णिमा असेल, तर दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून, हातावर राखी बांधते. आपले भावाप्रति प्रेम व्यक्त करते. निस्वार्थ, प्रेमाची व्याख्या म्हणजे भाऊ-बहिणींचं हे नातं. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल कामना असते.

महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतामध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. त्यास उत्तर भारतामध्ये त्याच 'राखी' म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये राखी पौर्णिमा असे म्हणतात. भारतीय समाजामध्ये ऐक्य आणि प्रेमभावना वाढीस लागावी यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांमध्ये रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण सर्वत्र साजरा केला जातो. 
बहीण-भावाच्या किंवा बंधुत्वाचे नाते असलेल्या व्यक्तीस ही राखी बांधते. 

"राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का?"​

स्त्री सन्मान हासुद्धा या सणाचा उद्देशच आहे. 'राखी' म्हणजे रक्षण म्हणजे सांभाळ. हा अर्थ लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे, अभय घेण्याची प्रथा आहे. ऐतिहासिक काळामध्ये चित्तोडची राणी कर्मवतीने हुमाँयू बादशाहाला राखी पाठवली आणि हुमाँयू बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादूरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले अशी आख्यायिका आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raksha Bandhan celebrations turn long distance and online due to Coronavirus