Office
Officeesakal

WFH बंद, IT कंपन्यांकडून ऑफिस उघडण्याची तयारी, पण कर्मचारी म्हणतायत...

हिंजवडीतील अनेक IT कंपन्यांनी कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर येण्यास सांगण्यास सुरू केले आहे.
Published on

पुणे : देशासह राज्यातील तसेच पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून, जवळपास सर्व व्यवहार पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत. याच पार्शभूमीवर पुण्यातील हिंजवडी सॉफ्टवेअर पार्कमधील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचार्‍यांना पुन्हा कार्यालयात कामावर येण्यास सांगण्याची प्रक्रिया सुरू केली असून, काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात परत यायचे आहे की नाही ? हे विचारणारे फॉर्म वितरित केले आहेत, अशी माहिती फोरम ऑफ आयटी प्रोफेशनल्सचे पवनजीत माने यांनी सांगितले. मात्र, हिंजवडी आणि आजूबाजूच्या मेट्रो मार्गाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रवासाचा वाढलेला वेळ पाहता ही कार्यालये 100 टक्के व्याप्तीसह किती लवकर सुरू होतील यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त प्रकाशित केले आहे. (HIjewadi IT Park )

Office
कोरोना काळात 'वर्क फॉर्म होम'; मेंटल हेल्थसाठी वरदान की शाप? 

कंपन्यांकडून लसीकरण शिबीरे

गेल्या दोन वर्षांपासून हिंजवडी सॉफ्टवेअर (IT Park) पार्कमधील विविध आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम (Work From Home) केले आहे. तर, इतर राज्यातील कर्मचारी त्यांच्या मूळ राज्यात गेले आहेत. गेल्या वर्षी कोविड-19 च्या वाढत्या केसेसमध्ये कंपन्यांनी कामावर परत येण्याच्या योजना आखल्या होत्या. त्यानंतर 2021 च्या सुरुवातीपासून, लस उपलब्ध झाल्यानंतर आयटी कंपन्यांनी त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना लसीकरण (Coron aVaccination) करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली होती. त्यानंतर यातील काही कार्यालये या वर्षाच्या सुरुवातीला सुरू करण्यासाठी पावले उचलली गेली. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे हे नियोजन पुन्हा पुढे ढकलण्यात आले.

परंतु, आता राज्यातील आणि शहरातील कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात रोडावल्याने अनेक कंपन्यांनी आता त्यांची कार्यालये सुरू करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली असून, काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात परत यायचे आहे की नाही ? हे विचारणारे फॉर्म वितरित केले आहेत. परंतु, आपल्याला कंपनीकडून कार्यालयात परत येण्याची कोणतीही सूचना मिळाली नसून एप्रिलनंतर कार्यालये पूर्ण सुरू होतील, अशी भावना असल्याचे शौविक डे या कर्मचाऱ्याने सांगितले.

Office
''फक्त गांधीच नाही, पाच राज्यांतील पराभवाला काँग्रेसचा प्रत्येक नेता जबाबदार''

कंपन्यांनी पुन्हा विचार करावा

दरम्यान, बहुतांश कर्मचाऱ्यांनी मेट्रो मार्गासाठी हिंजवडी (Metro Work In Pune) आणि परिसरात सुरू असलेल्या बांधकामाकडे लक्ष वेधत बांधकामामुळे हिंजवडी येण्या-जाण्याचा वेळ वाढणार असून, बहुतांश कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यायलयात कामावर बोलण्यावर कंपन्यांनी दोनदा विचार करण्याची इच्छा व्यक्त केली असून, उद्भवलेल्या साथीच्या काळात दीर्घकाळापर्यंत घरून काम केले जाऊ शकते हे सिद्ध झाल्याचे एका कर्मचाऱ्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com