लूटमारीसाठी कंत्राटदाराचा खून; दोघांना जन्मठेप

लूटमारीसाठी कंत्राटदाराचा 
खून; दोघांना जन्मठेप
Published on: 

पुणे, ता. ३ ः लुटमारीच्या उद्देशाने कंत्राटदाराचा चाकूने खून करून त्याच्या भाचीला गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
रझ्झाक रमजान शेख (वय ३७, रा. रामनगर, वारजे माळवाडी), संतोष नागनाथ वाघमारे (वय ३४, रा. वारजे गाव) यांना शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना १५ फेब्रुवारी २००८ रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वारजे माळवाडीतील डुक्करखिंड परिसरात घडली होती. कंत्राटदार रमेश नारायण चव्हाण आणि त्यांची भाची इंदू पवार दुचाकीवरून चांदणी चौकातून उत्तमनगरकडे जात होते. डुक्करखिंडीत चव्हाण हे लघुशंकेसाठी थांबले असता, आरोपींनी साथीदारांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने आणि मोबाईल असा सुमारे ५१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर चव्हाण आणि पवार यांच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी १८ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी इंदू पवार यांची साक्ष, चव्हाण यांनी उपचारादरम्यान दिलेला जबाब, वैद्यकीय पुरावे आणि न्यायवैद्यक अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com