esakal | राज्य सरकारकडून कोरोना चाचण्यांचे दर कमी; पुण्यात मात्र चाचण्यांसाठी लयलूट सुरूच 
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Corona Test

यासाठी ‘सकाळ’ने शहरातील विविध खासगी चाचणी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांशी संपर्क साधला तेव्हा हा प्रकार उघड झाला. 

राज्य सरकारकडून कोरोना चाचण्यांचे दर कमी; पुण्यात मात्र चाचण्यांसाठी लयलूट सुरूच 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोना चाचणीच्या दर कमी केले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजिन चाचणीसाठी अनुक्रमे ५०० आणि १५० असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, शहरातील काही खासगी प्रयोगशाळा, कोरोना सेंटर व रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजिन टेस्टसाठी नागरिकांना १५० ते ५०० रुपये तसेच आरटीपीसीआर चाचणीसाठी ६०० ते एक हजार रुपये मोजावे लागत आहे. यासाठी ‘सकाळ’ने शहरातील विविध खासगी चाचणी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांशी संपर्क साधला तेव्हा हा प्रकार उघड झाला. 

- पिंपरी-चिंचवडमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांनीही कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही ३१ मार्चला कोरोना चाचणीचे दर कमी केल्याचे जाहीर केले. शहरातील पाच खासगी प्रयोगशाळांशी संपर्क साधल्यावर राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसार आकारणी होत नसल्याचे दिसून आले आहे. चाचणीचे दर कमी केल्यामुळे नागरिकांना देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर तपासणीसाठी नमुने कशा प्रकारे गोळा करण्यात येत आहे. त्यानुसार विविध शुल्क आकारले जात आहेत. मात्र, या दरांची अंमलबजावणी पूर्णपणे झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाची सुरवात झाली तेव्हा आरटीपीसीआरसाठी साडेचार हजार रुपये घेतले जात होते. त्यानंतर राज्य सरकारकडून सातत्याने कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले आहे. तर आता ते ५०० रुपये करण्यात आले आहे. 
- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरटीपीसीआरचे नवे दर 

  • - संकलन केंद्रावर नमुने देण्यात आल्यास : ५०० 
  • - कोविड सेंटर, रुग्णालय, क्वारंटाइन सेंटर : ६०० 
  • - नागरिकांच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास : ८०० 


सुधारित दर आकारणी (सर्व करांसाहित रुपयात) 

सार्स कोविड १९ साठी रॅपिड अँटिजिन टेस्ट 

  • - रुग्ण स्वतः तपासणीसाठी प्रयोगशाळेत आल्यास : १५० 
  • - तपासणी केंद्रावरून आठ एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास : २०० 
  • - रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुने घेतल्यास : ३०० 


सध्या राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहेत. दोन दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात माझा पत्नीची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यासाठी ८०० रुपये घेण्यात आले. ती पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्ही त्वरित तपासणीसाठी जवळच्या खासगी प्रयोगशाळेत गेलो. मात्र, तिथे हजार रुपये प्रति व्यक्ती असे दर आम्हाला लावण्यात आले. बऱ्याच लोकांना दर कमी झाल्याचे माहिती नसल्याने सामान्य नागरिकांकडून जास्त पैसे घेतले जाऊ शकतात. 
- अमोल यादव

loading image