esakal | Pune Corona Update : नव्या रुग्णसंख्येत घट; मात्र ६१ रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update : नव्या रुग्णसंख्येत घट; मात्र ६१ रुग्णांचा मृत्यू

Pune Corona Update : नव्या रुग्णसंख्येत घट; मात्र ६१ रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुण्यात आज २,५७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,३०,२१० वर गेली आहे. पुण्यात सध्या ४०,७०१ रुग्णांवर उपचार आहे. पुण्यातून आज ४,०४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ३,८२,५१८ वर पोहोचली आहे. पुण्यात आज १२,२७६ चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह पुण्यातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही २१,७५,३५० वर पोहोचली आहे. पुण्यात आज ६१ मृत्यू झाले आहेत. या नव्या मृतांसह पुण्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही ६,९९१ वर पोहोचली आहे.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ९९१ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४० हजार ७०१ रुग्णांपैकी १,४११ रुग्ण गंभीर तर ६,७२१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात १२ हजार २७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २१ लाख ७५ हजार ३५० इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ०४६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ८२ हजार ५१८ झाली आहे.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

पुणे शहरात आज नव्याने २ हजार ५७९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ३० हजार २१० इतकी झाली आहे. पुणे मनपा हद्दीतील कोरोना लसीकरण मंगळवार दि. ४ मे २०२१ रोजी बंद राहणार असून लसीचा पुरवठा झाल्यावर पुढील माहिती उपलब्ध दिली जाईल. तर १८ वर्षांवरील नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण 'कमला नेहरू' व 'राजीव गांधी'मध्ये सुरु राहील.

loading image