esakal | Pune Corona Update: शहरातील १ हजार ५६० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Pune Corona Update: शहरातील १ हजार ५६० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : शहरात आज नव्याने ७३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६६ हजार ८५८ इतकी झाली आहे. शहरातील १ हजार ५६० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४९ हजार ९१२ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ७३७ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख ५१ हजार ७६५ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ८ हजार ८६८ रुग्णांपैकी १,०३२ रुग्ण गंभीर तर २,२२४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ०७८ इतकी झाली आहे. (Pune Corona Update Discharge to 1,560 corona victims in the Pune city)

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात 36 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ८५ दिवसानंतर (सुमारे तीन महिने) काल सोमवारी (ता.२४) पाचशेच्या आत आली होती. शहरातील आजची नवीन रुग्णसंख्या १ मार्चच्या रुग्णसंख्येच्या आसपास पोचली होती. काल फक्त ४९४ नवे रुग्ण आढळून आले होते. याआधी १ मार्चला ४०६ नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर २ मार्चपासून रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा ओलांडत पुढे तो साडेसात हजारांपर्यंत पोचला होता. यामुळे पुणे शहरातील कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा: IPS सुबोध कुमार जयस्वाल CBI च्या प्रमुखपदी

काही दिवसांपूर्वी दररोज 50 हजारांच्या पुढे आढळणारी कोरोना रुग्णसंख्या आता 30 हजारांच्या आत आली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 24 हजार 136 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 36 हजार 176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना मृतांच्या संख्येने 90 हजाराचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 601 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत विषाणूने 90 हजार 349 जणांचा बळी घेतलाय. राज्यात एकूण 52 लाख 18 हजार 768 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.