esakal | Pune: लहान मुलांवर होणार कोवोव्हॅक्सची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

Test

पुणे : लहान मुलांवर होणार कोवोव्हॅक्सची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

sakal_logo
By
दत्ता लवांडे

पुणे : कोरोना महामारीत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लहान मुलांना लवकरच लस उपलब्ध होऊ शकते. पुण्यातील भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेज मध्ये बुधवारी कोवोवॅक्स लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. तसेच दिल्लीत हमदर्द वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेत चाचणीसाठी कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा सुरू झाली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठातील वैद्यकीय संचालक संजय ललवानी यांनी सांगितले की बुधवारी ७ ते ११ वयोगटातील मुलांच्या कोवोवॅक्स च्या २ व ३ ऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु झाल्या आहेत. यासाठी ९ मुलांची निवड केली असून देशातील ९ केंद्रावर ही चाचणी होईल. भारती विद्यापीठ यामध्ये सामील आहे. डॉक्टर ललवानी यांनी सांगितले की चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या मुलांच्या आईवडिलांशी चर्चा केली आहे आणि मुलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून सल्ला दिला असून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. पालकांची अनुमती मिळाली की कर्मचाऱ्यांची RT-PCR चाचणी केली जाते जेणेकरून त्यांना या प्रक्रियेत भाग घेता येतो. असे डॉक्टर ललवानी यांनी एएनआय शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेला बळकटी : औद्योगिक उत्पादनात ११ टक्के वृद्धी

भारतात मुलांच्या लसीकरण मोहीमेला सुरूवात झाली असून यामध्ये सहभागी होण्यासाठी मुलांचे वय किमान २ ते १७ असायला पाहिजे. या चाचणीत मुलांना २१ दिवसांच्या अंतरावर दोन डोस दिले जातील. सीरम इंस्टीट्यूट ने भारतात आणलेल्या नोवोवॅक्स चे भारतीय रूपांतर कोवोवॅक्स आहे.

कोवोवॅक्स च्या मुलांवरील चाचणीसाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू.

अधिकृत सूत्रांनुसार या चाचणीत ९२० मुलं असून यात १२-१७ आणि २-११ वयोगटातील ४६०-४६० मुलं सहभागी आहेत. भारतीय औषध नियामक मंडळाने सीरम इंस्टीट्यूट ला काही अटी व कोविड-१९ वरील तज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारावर २-१७ वयोगटातील मुलांवर कोवोवॅक्स च्या चाचणीची परवानगी दिली होती.

loading image
go to top