esakal | पुणे : महानगरपालिकेत ७१ मौनी नगरसेवक
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे : महानगरपालिकेत ७१ मौनी नगरसेवक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या मतदार संघातील प्रश्‍न मांडत त्यावर उपाय शोधण्यासाठी महानगरपालिकेतील (pune corporation) सर्वसाधारण सभा हे महत्त्वाचे माध्यम असते. आपल्या वॉर्डासह शहराच्या विकासासाठी अनेक मुद्दे मांडण्याची संधी त्या माध्यमातून नगरसेवकांना (corporators) मिळते. मात्र महापालिकेतील ७१ नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत सर्वसाधारण सभेत एकही प्रश्‍न विचारला नसल्याची धक्कादायक माहिती परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या नगरसेवकांच्या कामाच्या प्रगतिपुस्तकातून पुढे आली आहे.

परिवर्तनने नगरसेवकांच्या कामाचे प्रगतिपुस्तक तयार करून त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये सभागृहात गेल्या चार वर्षांत (१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१) एकही प्रश्न न विचारणारे मौनी नगरसेवक, सभांना अनुपस्थित राहणा-या सभासदांची माहिती दिली आहे.

२०१७ पूर्वी तयार करण्यात आलेल्या प्रगतीपुस्तकात अशा नगरसेवकांची संख्या ८५ होती. यंदा ती १४ ने कमी होऊन ७१ पर्यंत खाली आहे. संस्थेने आज पत्रकार परिषद घेऊन प्रगतिपुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे मांडले. संस्थेचे अध्यक्ष इंद्रनील सदलगे, सदस्य भक्ती भावे, भरत बनाटे, ओशिन शर्मा, प्रणव जाधव यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यात पीएमपीची प्रवाशांना खूषखबर

प्रगतीपुस्तकातील महत्त्वाच्या बाबी

  • महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या चार वर्षात एकही प्रश्न विचारले नाही असे ७१ नगरसेवक

  • गेल्या वेळी ही संख्या ८५ तर २०१२ साली ४५ होती

  • सर्वसाधारण सभेला सर्वाधिक उपस्थित राहणा-या नगरसेविका - गायत्री खडके (९५ टक्के)

  • सभेला सर्वात कमी वेळा उपस्थित राहणा-या नगरसेविका - रेश्‍मा भोसले (३० टक्के)

पक्षनिहाय सरासरी उपस्थिती

पक्ष : टक्केवारी

काँग्रेस : ७७.११

भाजप : ८०.०४

राष्ट्रवादी काँग्रेस : ७१.७२

मनसे : ८३.५०

शिवसेना : ७१.५०

अपक्ष : ५९.२५

कोणत्या पक्षाच्या किती टक्के नगरसेवकांनी लेखी प्रश्‍न विचारले

पक्ष : टक्केवारी

काँग्रेस : ७७.७८

भाजप : ५३.६१

राष्ट्रवादी काँग्रेस : ५३.८५

मनसे : ५०.००

शिवसेना : ८०.००

अपक्ष : ५०.००

हेही वाचा: पाषाण : 'एनसीएल कॉलनी'तील 11 चंदनाची झाडे चोरीला

सर्वाधिक सर्वसाधारण सभांना उपस्थित असलेले नगरसेवक

प्रभाग नंबर -नाव - पक्ष - टक्केवारी

१५ ब- गायत्री खडके - भाजप- ९५

१३ ब - माधुरी सहस्रबुद्धे - भाजप- ९४

२५ क- रत्नप्रभा जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस - ९४

२९ अ- सरस्वती शेंडगे - भाजप- ९४

७ अ - सोनाली लांडगे - भाजप- ९३

१३ ड- जयंत भावे - भाजप - ९३

१९ ब - मनिषा लडकत - भाजप - ९३

२५ ड - प्रशांत जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस - ९३

सर्वसाधारण सभांना सर्वाधिक कमी उपस्थित असलेले नगरसेवक

प्रभाग नंबर - नाव - पक्ष - टक्केवारी

११ अ - दीपक मानकर - राष्ट्रवादी काँग्रेस - ४९

१४ ड - सिद्धार्थ शिरोळे - भाजप - ४८

३५ ब - आबा बागूल - काँग्रेस - ४२

२४ सी - आनंद अलकुंठे - राष्ट्रवादी काँग्रेस - ३२

७ ड - रेश्‍मा भोसले - अपक्ष - ३०

loading image
go to top