पालिकेने साडेअकरा कोटींच्या पिशव्या वाटल्या; पण कुणाला अन् कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पालिकेने साडेअकरा कोटींच्या पिशव्या वाटल्या; पण कुणाला अन् कधी?

पुणे : पुणे महापालिकेने नागरिकांच्या कररूपाने जमा झालेल्या पैशातून गेल्या पाच वर्षात ११ कोटी ५७ लाख रुपयांच्या पिशव्या खरेदी करून वाटप केले आहे. पण या पिशव्या नेमक्या कोणाला वाटल्या, कधी वाटल्या याची माहिती उपलब्ध नाही.

याप्रकरणाची चौकशी करावी यासाठी आत्तापर्यंत चार वेळा स्मरणपत्र पाठवले आहे, पण याची चौकशी झाली नाही. सीटी आय संस्थेचे संजय शितोळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची माहितीच सरकारकडे नाही

महापालिकेने खरेदी केलेल्या एका पिशवीची किंमत १५ रुपये धरली तरी ७७ लाख १५ हजार ४०० पिशव्या वाटप गेले. पण ५ वर्षात मला किंवा माझ्या कुटुंबातील एकाला व ओळखिच्यांनाही एकही पिशवी मिळाली नाही.याचाच अर्थ सदर प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे.

महापालिका आयुक्तांनी याची चौकशी करावी अशी मागणी केली होती. पण अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

Web Title: Pune Corporation Garbage Bag Free Distribution Corruption

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top