esakal | पुणे : महापालिकेचा कर्मचारीच निघाला मोबाईल चोर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे : महापालिकेचा कर्मचारीच निघाला मोबाईल चोर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेच्या (pune corporation) आरोग्य विभागातील कर्मचारीच मोबाईल चोर निघाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याने त्याच्यावरील कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरीचा मार्ग निवडला होता. त्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून पावणे दोन लाख रुपये किमतीचे २१ मोबाईल जप्त केले.

तानाजी शहाजी रणदिवे (वय ३३, रा. शांतिनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलिसांकडून बिबवेवाडी परिसरात गस्त घातली जात होती. त्यावेळी गंगाधाम रस्त्यावरील महावीर गार्डनजवळ मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा: Video : जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींनी दिला 'जय माता दी'चा नारा

त्यानुसार, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली, तेव्हा तो महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे व कर्ज फेडण्यासाठी त्याने बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरातून ५० हून अधिक मोबाईलची चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

loading image
go to top