सीमाप्रश्नी तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी; एकीकरण समिती | Marathi Ekikaran Samiti | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमाप्रश्नी तातडीने उच्चाधिकार समितीची बैठक बोलवावी; एकीकरण समिती

बेळगाव : महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी उच्चाधिकार कमिटीची तातडीने बैठक बोलवावी असा ठराव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला असून 17 जानेवारी रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांना मराठी भाषिकानी अभिवादन करावे असे आवाहन देखील समितीतर्फे करण्यात आले आहे. (Belgaon Marathi News)

हुतात्मा दिन आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. यावेळी दळवी यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिले रक्त बेळगावात सांडले गेले. या लढ्यातील हुतात्माना 17 जानेवारी रोजी सर्वांनी अभिवादन करावे. छत्रपती शिवाजी राजांचा अवमान करण्यात आला. त्यावेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले मात्र नागरीकांचा हक्क हिराहुन घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा: पुसेगाव : बैलबाजार भरू न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ

परंतु नागरिकांचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. समितीवर बंदी घालण्याची केली जात आहे. मात्र कोणत्या कलमाखाली बंदी घालणार आहात ते तरी समजू द्या मराठी भाषिकांवरील द्वेष दाखविण्यासाठी काळी शाई ओतणे किंवा राजांचा अवमान केला जात आहे. मात्र मराठी जनता कधीही अशा उपक्रमांना भिक घालणार नाही. असे मत व्यक्त केले.

माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी मराठी भाषिकांना वाटाळ नागराज याने नेहमीच डिवचण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणे गरजेचे आहे. हुतात्मा दिनासाठी परवानगीचा अर्ज लवकर देऊन त्याबाबतचा पाठपुरावा करणे गरजेचे असून जेलमध्ये असलेल्या युवकांची बाजू मांडणाऱ्या वकिलांची समितीकडून काय अपेक्षा आहे. याची माहिती घेऊन पाठपुरावा करावा असे मत व्यक्त केले.

हेही वाचा: नागपूरात चिमुकल्यासह चौघांना ओमिक्रॉन; १३३ जण कोरोनाच्या विळख्यात

निपाणी विभाग समितीचे अध्यक्ष निपाणी येथेही हुतात्मा दिनाचा कार्यक्रम करण्यास पोलिसांकडून आठकाठी केली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत निपाणीत हुतात्मा दिन यशस्वी केला जाईल अशी माहिती दिली.

माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे जगनाथ बिर्जे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला राजाभाऊ पाटील, बी डी मोहनगेकर, एस एल चौगुले, नानु पाटील, बी डी मोहनगेकर, सुनील आंनदाचे, ऍड एम जी पाटील, पी एच पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच निषेधाच्या ठरावासह 3 ठराव बैठकीत मांडण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :belgaum
loading image
go to top