Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Pune Corporator Post Auctioned : राजगुरुनगर नगर परिषदेच्या एका प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा असून, हा लिलाव सर्वसाधारण जागेसाठी एक कोटी रकमेच्या वरती गेल्याची, तर महिला राखीव जागेसाठी २२ लाखांवर गेल्याची माहिती आहे.
Pune Corporator Post Auctioned for ₹1 Crore

Pune Corporator Post Auctioned for ₹1 Crore

esakal

Updated on

राज्यात नगर परिषद निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १७ तारखेपर्यंत होती. त्याच दिवशी राजगुरुनगर परिषदेच्या एका प्रभागामधील गावकऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला. निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार, त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, असे त्यांनी ठरवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com