esakal | पुणे : ड्रेनेजवरील खर्चातच नगरसेवकांना रस
sakal

बोलून बातमी शोधा

Drainage Line

पुणे : ड्रेनेजवरील खर्चातच नगरसेवकांना रस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ड्रेनेज आणि पावसाळी वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने अर्थसंकल्पात स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, असे असतानाही नगरसेवकांनी आपल्या वॉर्डस्तरीय निधीचा सर्वाधिक वापर याच कामासाठी केला आहे. वॉर्डस्तरीय निधीमधील सर्वाधिक १६.८ टक्के खर्च (१५ कोटी ७१ लाख रुपये) ड्रेनेज व पावसाळी वाहिन्यांसंदर्भातील कामांसाठीच झाला आहे.

हेही वाचा: अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानची आतशबाजी

परिवर्तन संस्थेने नगरसेवकांनी केलेल्या वॉर्डस्तरीय निधीच्या खर्चाच्या विश्लेषणातून ही बाब पुढे आली आहे. एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत शहरातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित ९० कोटी ९० लाख ८७ हजार ३२६ रुपये वॉर्डस्तरीय निधीतून विविध कामांसाठी खर्च केले आहेत. प्रत्येक नगरसेवकाने वॉर्डस्तरावर सरासरी ५६ लाख ११ हजार ६५० रुपये खर्च केले आहेत.

वॉर्डस्तरीय निधीतील सर्वाधिक खर्च ड्रेनेज व पावसाळी पाण्याच्या लाइन टाकणे व दुरुस्तीवर झाला आहे. तर नगरसेवकांनी ११ कोटी ५७ लाख रुपयांच्या कापडी पिशव्या पुणेकरांना वाटल्या असून तब्बल पाच कोटी ७१ लाख रुपये राडारोडा उचलण्यासाठी खर्च केल्याचे नमूद आहे.

खर्चाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे

  • राजकीय पक्षनिहाय वॉर्डनिहाय निधी खर्च करण्यात कोणताही विशेष पॅटर्न नाही

  • ड्रेनेजविषयक कामे व कापडी पिशव्या वाटपाच्या कामांना नगरसेवकांची पसंती

  • पहिल्या तीन वर्षांत आपत्ती मदतकार्यावर झालेला खर्च नगण्य

  • गेल्या वर्षात कोरोनाच्या साथीमुळे मास्क, सॅनिटायझर, साबण वाटपात वाढ

९०,९०,८७,३२६ रुपये

सर्व नगरसेवकांनी वापरलेला

एकत्रित वॉर्डस्तरीय निधी

५६,११,६५० रुपये

प्रत्येक नगरसेवकाने केलेला सरासरी खर्च

नगरसेवकांकडून या कामांना प्राधान्य

loading image
go to top