रिटायर अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्टनंतर १.१९ कोटींना लुटलं, धक्क्यानं मृत्यू; ३ मुली परदेशात

Pune Digital Arrest Case पुण्यात डिजिटल अरेस्ट करून वृद्ध दाम्पत्याचे १.१९ कोटी रुपये लुटल्यानंतर वृद्ध पतीचा धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलीय.
Pune Digital Arrest Scam Retired Officer Loses Rs 1.19 Crore Dies of Shock

Pune Digital Arrest Scam Retired Officer Loses Rs 1.19 Crore Dies of Shock

Esakal

Updated on

डिजिटल अरेस्टच्या घटनांमध्ये अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वृद्धांना जास्ट टार्गेट केलं जात आहे. पुण्यात विश्रांतवाडीतील राज्य सरकारच्या नोकरीतून निवृत्त झालेल्या ८२ वर्षीय अधिकाऱ्यासह पत्नीला ३ दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आलं होतं. त्यांच्याकडून १.१९ कोटी रुपये लुटण्यात आले. पैसे गमावल्याच्या धक्क्यानं वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आता घडलीय. पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीने सायबर पोलिसांशी संपर्क केला आणि तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर घटनेनंतर वृद्धाच्या परदेशात राहणाऱ्या तिन्ही मुलींना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com