Court dismisses father’s DNA test request, protecting minor daughters from emotional distress.
पुणे : लग्नानंतर सात जन्म साथ देण्याच्या आणाभाका घेत एका जोडप्याने २०१५ मध्ये संसाराची गुंफण बांधली. सुरुवातीला सर्व सुरळीत असलेला हा संसार दोन मुलींच्या आगमनाने अधिक बहरला. मात्र कालांतराने पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्याने पत्नीने दोन वर्षांपूर्वी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर छोटी मुलगी माझी नाहीच, तिचा डीएनए तपासावा, अशी मागणी करणारा अर्ज पित्याने दाखल केला. न्यायालयाने हा अर्ज फेटाळत पतीला पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.