Pune court grants bail to Vikas Lawande
esakal
पुणे : वारकरी संप्रदायाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला (Vikas Lawande bail news Pune) आहे. गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून या गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे, त्यांच्या न्यायालयीन कोठडीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी हा आदेश दिला.