
आम्ही आमच्या पक्षकारांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे. येत्या १५ दिवसांत सर्व कामकाज व्यवस्थितपणे सुरू होईल, असा विश्वास ॲड. पुष्कर दुर्गे यांनी व्यक्त केला.
पुणे, - न्यायालयीन कामकाज मर्यादित प्रमाणात सुरू ठेवल्याचा आम्हाला व पक्षकारांना मोठा फटका बसला आहे. मात्र, नियमित काम सुरू झाल्याने प्रलंबित खटल्यांवर सुनावणी होत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षकारांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे. येत्या १५ दिवसांत सर्व कामकाज व्यवस्थितपणे सुरू होईल, असा विश्वास ॲड. पुष्कर दुर्गे यांनी व्यक्त केला.
हे वाचा - किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केला नवा आरोप
सोमवार (ता. ११) पासून येथील जिल्हा न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू झाले आहे. त्यामुळे न्यायालयात येणारे पक्षकार आणि वकिलांची संख्या सध्या वाढली आहे. तर न्यायिक कामाची वेळ वाढल्याने सुनावणीला बूस्टर मिळाला आहे. या निर्णयाने पक्षकार आणि वकिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वकिलांनी आपल्या पक्षकारांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडण्यासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून न्यायालयात केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यामुळे सर्वच प्रकरणांच्या तारखा नसल्याने वकिलांना मोठा वेळ मिळाला. त्याचा उपयोग कायद्याचा अभ्यास करण्यासाठी केल्याची माहिती वकिलांनी दिली.
सुप्रिया सुळे म्हणतात, 'पुण्याचा महापौर आता राष्ट्रवादीचाच'
न्यायालयात नियमित येण्यास सुरुवात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सीनिअर वकील प्रत्यक्ष न्यायालयात जाऊन काम करणे टाळत होते. त्यासाठी ते त्यांचे ज्युनिअर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर करीत. मात्र, आता त्यांनी देखील नियमितपणे न्यायालयात येण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाविषयक खबरदारीबाबत सर्व उपाययोजना पुणे बार असोसिएशनकडून न्यायालय परिसरात राबविण्यात येत आहेत.