esakal | पुणे न्यायालयाचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात समन्स, कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

पुणे दिवाणी न्यायालायाने ठाकरे व राऊत यांना 11 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे न्यायालयाचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात समन्स, कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्रात भारतऐवजी हिंदुस्तान असा शब्द वापरण्यात येत असल्याने पुणे दिवाणी न्यायालयाने मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सामनाचे संपादक संजय राऊत यांच्याविरोधात समन्स बजाविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे दिवाणी न्यायालायाने ठाकरे व राऊत यांना 11 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान यांच्याविरोधात न्यायालयाने समन्स काढले आहेत. 

'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

सामना वृत्तपत्रामध्ये भारत ऐवजी हिंदुस्तान छापले जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे आणि राऊत हजर न राहिल्यास पुढील कारवाई काय होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच 'सामना' आपल्या भाषेत बदल करेल का, हा प्रश्न आहे.