Pune News : छुप्या संदेशाला डिकोड करणारी प्रणाली संरक्षण क्षेत्राला मिळणार - डॉ. सी.पी.रामनारायणन

देशाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने शेजारच्‍या देशाद्वारे आखण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती व संदेश ‘डिकोड’ करण्यासाठी लवकरच एक अत्याधुनिक प्रणालीचा विकास करण्यात येणार आहे.
cp ramnarayanan
cp ramnarayanansakal
Summary

देशाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने शेजारच्‍या देशाद्वारे आखण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती व संदेश ‘डिकोड’ करण्यासाठी लवकरच एक अत्याधुनिक प्रणालीचा विकास करण्यात येणार आहे.

पुणे - देशाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने शेजारच्‍या देशाद्वारे आखण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती व संदेश ‘डिकोड’ करण्यासाठी लवकरच एक अत्याधुनिक प्रणालीचा विकास करण्यात येणार आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) तीने लष्कराचे गुप्तचर विभाग तसेच इतर संरक्षण क्षेत्राशी निगडित एजंसीसाठी अशा विशेष संदेशाला डिकोड करण्यासाठी ‘सेंटर ऑफ एक्सिलेन्स फॉर क्रप्टॲनॅलिसिस अँड क्रिप्टोग्राफी’ साकारण्यात येत आहे. यासाठी तज्ञांचे गट तयार केले जाणार असल्याची माहिती डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सी.पी.रामनारायणन यांनी शुक्रवारी संस्थेत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी डीआयएटीच्या डॉ. संगिता काळे, डॉ. बालासुब्रमण्यम आदी उपस्थित होते. डीआयएटी ही संरक्षण व समाजातील विविध समस्यांना सोडविण्यासाठी आवश्‍यक त्या तंत्रज्ञानाच्या विकासात कार्यरत असून संस्थेद्वारे तंत्रज्ञानातील विविध शैक्षणिक अभ्यासक्रम राबविण्यात येतात. तसेच कृत्रिम बुद्धीमत्ता, क्‍वांटम तंत्रज्ञान, मशिन लर्निंग, सायबर सुरक्षा अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानावरील प्रणालीचा विकास करण्यात येत आहे. याचा सशस्त्र दलांसोबत, समाजाला देखील फायदा होत असून सध्या संस्थेद्वारे अनेक प्रकल्पांवर काम करण्यात येत आहे.

डॉ. रामनायारणन म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देशात प्रगती होत असली तरी सुद्धा गुप्‍त संदेशांना ‘डिकोड’ करण्यावर संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्याची अधिक आवश्‍यकता आहे. सध्याची स्थिती पाहता माहिती गोळा करण्यात अडचण नाही, परंतु त्या माहिती योग्य पद्धतीने विश्लेषण करत त्यातील छुपा संदेश ओळखणे यासाठी डीआयएटीद्वारे क्रिप्टॲनॅलिसिस वर काम करण्यात येणार आहे. तसेच त्याची अचूकता ही ९० टक्क्यांपर्यंत असेल. लवकरच या प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळेल.’

‘न्यूक्लिअर डायमंड बॅटरी’ ही सहा हजार वर्षांपर्यंत कार्यान्वित राहील अशा बॅटरीची निर्मिती डीआयएटीद्वारे करण्यात येत आहे. सध्या अवकाशात पाठविण्यात येणाऱ्या उपग्रहांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. त्या उपग्रहांसाठी या बॅटरी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत. यासाठी आवश्‍यक असलेल्या ‘नॅनो डायमंड’ची निर्मिती देखील करण्यात येत असून याच्या निर्मितीसाठी येणारा खर्च देखील अत्यंत कमी आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था देखील बदलेल, तसेच हरित तंत्रज्ञान, पुनर्वापर तंत्रज्ञान यास साध्य करणे शक्य होणार आहे.

नव्या अभ्यासक्रमांची सुरवात -

डीआयएटीद्वारे या वर्षभरात नव्या शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने एम.टेक आणि एम.एस्सी साठी नव्या अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येणार आहे. त्यामध्ये एम.टेक साठी ग्रीन टेक्नॉलॉजी आणि अक्षय ऊर्जा या विषयांच्या अभ्यासक्रमासोबत पाच एम.एस्सी चे अभ्यासक्रम राहणार आहेत. त्यात सेन्सर तंत्रज्ञान, डेटा सायन्स, उपयोजित रसायनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान आणि टेक फोटॉनिक्स यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येकी २० विद्यार्थी अशी क्षमता ठेवण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी डीआयएटीमध्ये ६० ते ८० विद्यार्थ्यांना असे डॉ. बालासुब्रमण्यम यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना संधी -

राफेल या लढाऊ विमानाच्‍या निर्मितीत सक्रिय असलेल्या दसॉल्ट कंपनीमध्ये ही डीआयएटीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळत आहे. यासाठी प्रत्येक वर्षी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. तसेच बी.ई आणि बी.टेक मध्ये ७५ टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना थेट पीएचडी करण्यात येणार आहे. यासाठी नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. असेही डॉ. रामनारायणन यांनी नमूद केले.

डीआयएटीची कामगिरी -

- रडार आणि सेंसर तंत्रज्ञान

- न्यूक्लिअर डायमंड बॅटरी

- हायड्रोजनला सुरक्षित हाताळण्यासाठी उत्प्रेरक (कॅटलिस्ट)

- सॉफ्ट स्किल अँटी ड्रोन तंत्रज्ञान

- क्वांटम तंत्रज्ञानावरील स्वदेशी उपकरणे

- अवकाश ते पाण्याखालील संप्रेषण प्रणाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com