Pune : कलाकारांना व्यवसायासाठी अनोखे दालन ‘कलादालन’ या ऑनलाइन व्यासपीठाची निर्मिती

समाज माध्यमांवर जे समूह होते, ते प्रामुख्याने अनुभवी व्यावसायिकांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी काम करत होते
Pune
Punesakal

Pune - हातात कला असल्याने अगदी घरच्या घरी देखील उत्तमोत्तम कलाकृती तयार करणारे अनेक कलाकार असतात. मात्र त्याचे व्यवसायात रुपांतर करून या कलाकृती योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य अनेकांपाशी नसते.

हीच बाब हेरत ऐश्वर्या सापटणेकर यांनी ‘कलादालन - एक अनुभूती’ या अनोख्या ऑनलाइन व्यासपीठाची निर्मिती केली आहे. हस्तकला आणि चित्रकलेतील उत्पादनांचा समावेश असलेल्या या व्यासपीठाचा परीघ दिवसेंदिवस विस्तारतो आहे.

Pune
Mumbai : धारावी इमारत दुर्घटनेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सापटणेकर यांनी २०२१ च्या डिसेंबर महिन्यात या ऑनलाइन व्यासपीठाची सुरूवात केली. ही कल्पना कशी सुचली, याबाबत त्या सांगतात, ‘‘मी स्वतः चित्रकला शिकते आणि विविध प्रकारची चित्रेही काढते. २०२०-२१ मध्ये मी ऑनलाइन पद्धतीने माझी चित्रे विकण्याचा विचार केला, तेव्हा मला योग्य व्यासपीठ सापडले नाही.

समाज माध्यमांवर जे समूह होते, ते प्रामुख्याने अनुभवी व्यावसायिकांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी काम करत होते. पण माझ्यासारखे जे कलाकार व्यवसायात फार प्रवीण नाहीत, पण त्यांना त्यांच्या कलाकृतींसाठी ग्राहक हवे आहेत, त्यांच्यासाठी असे विशेष काही उपलब्ध नव्हते. त्यातून या ‘कलादालन’ या ऑलनाइन व्यासपीठाची कल्पना सुचली.’’

विशेष म्हणजे, या व्यासपीठावर आपल्या कलाकृतीची जाहिरात करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. केवळ या कलाकृती हस्तनिर्मित (हँडमेड) आणि स्वनिर्मित असाव्यात, एवढीच अट ठेवण्यात आली आहे. सराईत व्यावसायिक किंवा मध्यस्थांना नाही, तर खरोखर मनापासून काम करणाऱ्या कलाकारांना संधी मिळावी, हा यामागील उद्देश आहे.

Pune
Pune City Protest : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खड्ड्यांचा दशक्रिया विधी, शिवाजीनगर भागातील खड्डे बुजवण्याची मागणी

दोन वर्षांत या व्यासपीठावर सुमारे शंभर कलाकारांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या असून दोन हजार ग्राहक या समूहाशी जोडले गेले आहेत. यामध्ये ओमान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई अशा परदेशांतील ग्राहकांसह दिल्ली, कोलकता, हैद्राबाद, मुंबई अशा देशातील विविध शहरातींल ग्राहकांचाही सहभाग आहे. या व्यासपीठाच्या विस्तारामध्ये सापटणेकर यांना मुलगी अनुष्का सापटणेकर आणि बहीण जुईली कुलकर्णी या देखील मदत करत आहेत.

Pune
Mumbai - Pune Expressway : अद्ययावत ट्रामा केअर सेंटर, एअर ॲम्बुलन्सचीही गरज

प्रत्यक्ष प्रदर्शनांचेही आयोजन

ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले असले तरी कलाकृती प्रत्यक्ष पाहून, त्या हाताळून मग खरेदी करण्यासही ग्राहक पसंती देतात. हेच लक्षात घेऊन ऐश्वर्या सापटणेकर यांनी गतवर्षी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात पुणे शहरात प्रत्यक्ष प्रदर्शनांचे आयोजन केले होते. या प्रदर्शनांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता लवकरच या समूहाचे तिसरे प्रदर्शन भरवणार असल्याचे सापटणेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com