Pune : स्मशानभूमीत मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या साहाय्याने अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार आणि क्रियाविधीसाठी पाण्याचे बॅरल गावातून घेऊन जावे लागतात.
pune
punesakal

आंबेगाव : नव्याने पुणे महपालिकेत समाविष्ट झालेल्या कोळेवाडीतील ग्रामस्थांच्या दुःख अपेष्टा काही संपण्याचे नाव घेत नाहीत.ग्रामपंचायती महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यावर गावात शाश्वत विकास होईल अशी ग्रामस्थांची असलेली अपेक्षा सपशेल फोल ठरल्याचे चित्र दिसते आहे.

पाणी, ड्रेनेज,कचरा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात पालिकेला अपयश आल्याने ग्रामस्थांमधे नाराजीचा सुर उमटत आहे. याउपर,अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायतीकडून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत लाईट नसल्याने अंत्यसंस्कार मोबाईल टॉर्च आणि बॅटरीच्या साहाय्याने करण्याची नाच्चकी ग्रामस्थांवर ओढवली आहे.

कोळेवाडी हद्दीतील नवीन सर्व्हे नं ५ मध्ये , जांभूळवाडी - कोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असताना स्मशानभूमी बांधण्यात आली आहे.त्यानंतर ,सदरील स्मशनभूमीत लाईट आणि पाण्याची कोणतीही सोय ग्रामपंचयतीतर्फे करण्यात आली नाही.शिवाय स्मशानभूमीला रंगही देण्यात आला नव्हता.स्मशानभूमीकडे जाणारा पक्का रस्ता नाही.

पावसाळ्यात हा रस्ता निसरडा होतो. तर अंत्यसंस्कार आणि क्रियाविधीसाठी पाण्याचे बॅरल गावातून घेऊन जावे लागतात. दरम्यान , महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यानंतर पालिकेतील प्रशासक तरी गावांकडे जातीने लक्ष घालतील असे वाटत होते. परंतु , असे काहीही न घडता गावातील समस्यांच्या डोंगराकडे पालिकेकडूनही रीतसर पाठ फिरवलेली दिसते आहे.आगीतून फुफाट्यात आल्याच्या भावना नागरिकांनी सकाळ कडे व्यक्त केल्या

गाव बदलून मरण पत्कराव का?

मरणानंतरही इतक्या यातना होत असतील तर मरतेवेळी आम्ही गाव बदलाव का? असा सवाल नागरिक करत आहेत.एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्मशानभूमीत जाण्यासाठी ससेमिरा करण्यापेक्षा गाव बदलूनच मरण पत्कराव असा विचार जेष्ठ नागरिक करत आहेत.

पालिकेकडून आमची घोर निराशा होते आहे.पाणी,कचरा, ड्रेनेज या सुविधाही पालिकेला पुरविता येत नाहीत.अंत्यसंस्कार आम्हाला मोबाईल टॉर्च आणि बॅटरीने करावे लागत आहे.महापालिकेने आमची इतकी प्रतारणा करू नये.

- आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती , कोळेवाडी.

स्मशानूमीसाठी वीज जोड मागणी सबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून करायला पाहिजे.परंतु आता गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने तेथील स्मशनभूमीसाठी वीजजोड ही महापालिकेच्या विद्युत विभागाने करायला हवी. त्यानंतर ,तत्काळ महावितरणाकडून वीज जोड करण्यात येईल.

- निशिकांत राऊत , जनसंपर्क अधिकारी विद्युत महावितरण पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com