Pune Crime : पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा

राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी असल्याचे भासवून एका महिलेने पाच लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
Crime
Crimesakal
Summary

राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी असल्याचे भासवून एका महिलेने पाच लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे - राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी असल्याचे भासवून एका महिलेने पाच लाख रुपये खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका महिलेसह तिच्या एका साथीदारावर कोथरुड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक- २ ने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन गुलाब शिंदे (रा. कोथरूड) यांची डुक्करखिंड येथे वडिलोपार्जित जागा आहे. या जागेवरील पत्राशेड अनधिकृत असल्याबाबत पूजा काळू तायड (रा. कोथरुड) यांनी महापालिकेत ऑगस्ट २०२२ मध्ये अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी व शेडवर कारवाई न करण्यासाठी तायड आणि त्यांचा साथीदार नीलेश शंकर वाघमारे (रा. कोथरुड) यांनी फिर्यादीला ‘तुमच्या शेडवर कारवाई करायची नसेल तर आठ लाख रुपये द्यावे लागतील. पैसे न दिल्यास जीवे मारू’, अशी धमकी दिली.

तडजोडीअंती पाच लाख रुपयांची मागणी करीत असल्यामुळे फिर्यादीने दोन जानेवारी रोजी तक्रार दिली होती.

खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी या तक्रारीची दखल घेतली. सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे यांनी अर्जाची सखोल चौकशी केली. त्यानंतर महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com