
Pune Police parade youths arrested for uploading reels in support of the Andekar gang, showcasing strict action against gang glorification.
esakal
Summary
मंथन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु यांना अटक केली.
समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आंदेकर टोळीवर आधीच मोका अंतर्गत कारवाई झाली असून नव्या पुराव्यांनंतर आणखी गुन्हे नोंदवले गेले आहेत.
पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीविरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले असतानाच आता काही तरुणांनी आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनीआरोपींना ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली.