Dhol Tasha Pathak members booked for molestation
esakal
Woman journalist assaulted during Ganpati Visarjan: गणपती विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकाराचा विनयभंग करत तिच्या सहकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यात ढोल ताशा पथकातील दोन सदस्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी हे त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्य आहेत. याप्रकरणी २० वर्षीय महिला पत्रकाराने फिर्याद दिली आहे.