Pune Crime : पोलिसांची शक्कल! आरोपीला पकडण्यासाठी घेतली इंस्टाग्रामची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune Crime : पोलिसांची शक्कल! आरोपीला पकडण्यासाठी घेतली इंस्टाग्रामची मदत

लोणीकंद : एका प्रसिध्द विवाह नोंदणी संकेतस्थळ (matrimonial website) वर ओळख निर्माण करत लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. तर विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला आहे.

हेही वाचा: Pune Crime : येरवड्यातील पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुमार हकींगसिंग चहर (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. राकेश मूळचा गोव्याचा असून तो विवाहित असतानाही त्याने विवाह नोंदणी संकेतस्थळावर विवाह नोंदणी केली. त्यानंतर त्याने एका तरुणीशी ओळख करुन तिच्याशी काही दिवसात भावनिक संबंध वाढविले.

हेही वाचा: Pune Crime: प्रेयसीचा खून केलेल्या 'त्या' प्रियकराची मुळशी डॅमजवळ आत्महत्या

त्यानंतर त्याने तरुणीला आपल्याला आईस्क्रीम व्यवसाय सुरू करायचा आहे असं सांगून तिच्याकडून सात लाख रुपये घेतले. तरुणी त्यानंतर त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने त्याचे दोन्ही मोबाइल बंद केले. यावरुन तरुणीला संशय आल्याने तिने पैसे परत मागितले असता त्याने तिला शिवीगाळ केली आणि मोबाईल बंद केला..

हेही वाचा: Pune Crime : मेहुणा मेहुणीचा कारभार! पुण्यात मिळून करायचे चोरी; पोलिसांकडून अटक

याबाबतची तक्रार तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन लोणीकंद पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली. आरोपीचा मोबाईल बंद येत असल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण जात होते.

हेही वाचा: Pune Crime: धक्कादायक! पुण्यात प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

त्यानंतर पोलिसांनी शक्कल लढवत त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन राकेशचा फोटो मिळवला. त्या फोटोत फ्लॅटच्या गॅलरीचा काही भाग दिसत होता. त्यावरून पोलिसानी शोध घेत त्याला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे