Pune Crime : प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या

आदर्श मेनन आणि रसिका दिवटे यांचे प्रेमसंबंध होते. रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरून वेळोवेळी क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज तसेच लोन ॲपवरुन कर्ज काढून त्याला पावणेचार लाख रुपये दिले होते.
Crime News
Crime News sakal

पुणे - प्रेयसीने स्वतःचे क्रेडीट कार्ड, वैयक्तिक कर्ज आणि पाच ते सहा लोन ॲपवरून घेऊन दिलेले कर्ज प्रियकराने परत न केल्याने प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मांजरीत असलेल्या शारदा अनन्या सेंटरमध्ये शुक्रवारी (ता. १५) पहाटे प्रकार घडला. प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे (वय २५, रा. घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी आदर्श अजयकुमार मेनन (वय २५, रा. शारदा सेंटर, मांजरी) याला अटक करण्यात आली आहे. चंदा दिवटे (वय ४८, रा. घोरपडी) यांनी याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

आदर्श मेनन आणि रसिका दिवटे यांचे प्रेमसंबंध होते. रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरून वेळोवेळी क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज तसेच लोन ॲपवरुन कर्ज काढून त्याला पावणेचार लाख रुपये दिले होते. कर्जाचे हप्ते आपण फेडू, असे आश्वासन आदर्शने तिला दिले होते.

Crime News
R. Madhavan: अभिनेता आर माधवन यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड

मात्र, त्याने कर्ज फेडले नाही. गुरुवारी (ता. १४) रात्री रसिका त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी आदर्शने कर्ज फेडण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर तिने पहाटे आदर्शच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदर्शला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक गांधले या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Crime News
Jaydev Unadkat : W, W, W, W, W, W... पृथ्वीनंतर आता जयदेवने इंग्लंडला लावलं वेड; लीस्टरशायरच्या तोंडचा घास पळवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com