

Sunny Waghchoure, popularly known as Pune’s ‘Golden Man’, who received an alleged extortion threat linked to the Bishnoi gang, prompting a police probe.
esakal
पुण्याचा गोल्डन मॅन म्हणून ओळख असेल्या सनी नाना वाघचौर यांस बिश्नोई गॅंगकडून पाच कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास तुझा बाबा सिद्दिकी करु अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गॅंगमधील शुभम लोणकर याने ही धमकी दिल्याने गोल्डन मॅन सनी ने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठले अन् लेखी तक्रार दाखल केली. तसेच पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे.