Crime
sakal
पुण्यात लॉ कॉलेज रोडवर ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर कोयत्याने हल्ला झाला.
हल्ला झालेला पोलिस अमोल काटकर हे गुन्हे शाखा युनिट-३ मध्ये कार्यरत आहेत.
मध्यरात्री बाईकवरील दोन व्यक्तींनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.
विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता पोलिसच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. ड्यूटी संपवून घरी जात असताना एका पोलिसावर दोघांनी कोयत्याने वार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.