
थोडक्यात
पुण्यात भारती विद्यापीठ परिसरात नवविवाहित स्नेहा झेंडगेने सासरच्या छळ व २० लाख रुपयांच्या आर्थिक मागणीमुळे आत्महत्या केली.
पतीसह सात जणांवर शारीरिक, मानसिक छळ आणि हुंडाबळीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल.
स्नेहाने रक्षाबंधनादिवशी घरात कोणी नसताना गळफास घेऊन जीवन संपवले.
राज्यभर चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात आणखी एका नवविवाहित महिलेने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपविल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. पती आणि सासरच्या लोकांच्या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे, तसेच कंपनी सुरू करण्यासाठी २० लाख रुपये देण्याच्या दबावामुळे नवविवाहित महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.