Pune Crime : सदाशिव पेठेतील महिलेची ५० लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं?

व्हॉटसॲपवर लिंक पाठवून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपवर बँक खात्याची माहिती भरून घेतली. चोरट्यांनी महिलेकडून १६ एप्रिलपर्यंत वेळोवेळी पैसे घेतले. परंतु महिलेला कोणताही परतावा दिला नाही.
pune crime news
pune crime newsesakal

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने महिलेची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सदाशिव पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी १७ जानेवारी रोजी या महिलेच्या मोबाईलवर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखवले.

pune crime news
Pune Crime : बांधकाम साईटवर सुपरवायझरचा चाकूने भोसकून खून; पाचव्या मजल्यावरुन दिले फेकून

त्यानंतर त्यांनी महिलेला व्हॉटसॲपवर लिंक पाठवून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या ॲपवर बँक खात्याची माहिती भरून घेतली. चोरट्यांनी महिलेकडून १६ एप्रिलपर्यंत वेळोवेळी पैसे घेतले. परंतु महिलेला कोणताही परतावा दिला नाही.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा खडक पोलिस ठाण्याकडे तपासासाठी सोपविला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com