Rana Kamble killed Pune CCTV video
esakal
पुणे : शहरातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर येत आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही पुण्यातील गंगानगर परिसरात भररस्त्यात तडीपार गुंडाची कोयत्याने हत्या (Pune gangster killed latest news) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.