Crime News
Crime Newsesakal

Pune Crime News : धक्कादायक! प्रेयसीच्या लहानग्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारलं

या बाळाचं संपूर्ण शरीर भाजलं गेलं असून १५ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
Published on

आपल्या प्रेयसीच्या लहानग्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारल्याच्या आरोपावरून पुण्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विक्रम शरद कोळेकर असं या गुन्हेगाराचं नाव असून तो खेड इथं राहतो. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Crime News
धक्कादायक! पतीचं निधन; तेराव्याच्या दिवशीच पत्नीवर राहत्या घरी दीराकडून बलात्कार | Paithan Crime

पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, ६ एप्रिल रोजी सकाळी विक्रम शरद कोळेकर याने खेड इथं महिलेच्या घरी जाऊन तिच्या लहान मुलाला उचलून उकळत्या पाण्यात बुडवलं. यावेळी ही महिला बाहेर गेली होती. तिने आरोपीला थोडा वेळ आपल्या मुलाकडे पाहायला सांगितलं होतं.

यामध्ये बाळाचं संपूर्ण शरीर भाजलं गेलं आहे. ६ एप्रिल रोजी या अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण १५ दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. ही महिला पतीपासून वेगळी राहत होती. तिने विक्रमला लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे नाराज असलेल्या प्रियकराने ही कृती केली आहे.

Crime News
Pune Crime : नऱ्हे येथे पिस्तुलचा धाक दाखवून वाईन शॉप मालकाकडून रोकड लुटीचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिला आणि तिच्या बहिणीला इजा करण्याची धमकी दिली. आरोपी आता पोलीस कोठडीत असून पोलीस हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com