पैशांच्या वादातून पुण्यातील एका व्यक्तीवर खुनी हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

डेक्कन पोलिसांकडून तरुणास अटक
पैशांच्या वादातून पुण्यातील एका व्यक्तीवर खुनी हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : हातउसने घेतलेले पैसे देण्यास विलंब झाल्याच्या कारणावरुन ओळखीच्या तरुणाने एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 23 मार्चला एरंडवण्यातील साठे चौकात घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकास अटक केली आहे. इंद्रनील चंद्रभूषण मिश्रा (वय 40, रा. खिलारवाडी ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रवीण शंकर कडू (वय 37, रा. सिंहगडरोड ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगला मिश्रा (वय 67) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगला मिश्रा यांचा मुलगा इंद्रनीलने आरोपी प्रवीणकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे देण्यास प्रवीणला उशीर झाला. त्यामुळे प्रवीणने त्यास शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले होते.

पैशांच्या वादातून पुण्यातील एका व्यक्तीवर खुनी हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या 5 जणांना अटक

या हल्ल्यात इंद्रनील गंभीर जखमी झाला होता. स्थानिक नागरीकांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच डॉक्‍टांनी 14 एप्रिलला इंद्रनीलचा मृत्यु झाल्याचे घोषीत केले. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी कडूविरुद्ध प्रारंभी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, इंद्रनीलचा मृत्यू झाल्यानंतर कडूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com