Pune Crime News
esakal
भोर (पुणे) : नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शवविच्छेदनादरम्यान महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. आरोपीने मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबल्याचे, तसेच तिच्या छातीवर जखमांचे स्पष्ट वळ उमटले असल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.