Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Senior Citizen Loses 19 Lakh in Pune Mobile Access Fraud: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; घरातून पाच लाखांचे दागिने, भाजी मार्केटमधून ७५ हजारांची रोकड चोरीला
Pune Cyber Fraud News Dhankawadi Victim Loses 87 Lakh in Investment Scam as Senior Citizen and Share Trader Are Cheated Online

Pune Cyber Fraud News Dhankawadi Victim Loses 87 Lakh in Investment Scam as Senior Citizen and Share Trader Are Cheated Online

sakal

Updated on: 

पुणे : कर्वेनगरमधील एका सदनिकेच्या स्वयंपाकघरात पोटमाळ्यावर ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमधील बिजली तालीम चौकाजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तक्रारदार महिलेने (वय ४२) घरातील स्वयंपाकघरात पोटमाळ्यावर सोन्या-चांदीचे दागिने सुरक्षित ठेवले होते. चोरट्याने नजर चुकवून हे दागिने चोरून नेले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उत्पादनावर कमिशन देण्याच्या बहाण्याने ८७ लाखांची फसवणूक

कंपनीचे उत्पादन भाडेतत्त्वावर देऊन त्यावर दररोज अडीच टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीला ८७ लाख ५८ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने तक्रारदाराशी (वय ५९, रा. धनकवडी) संपर्क साधून एका नामांकित कंपनीचा एजंट असल्याचे सांगितले. कंपनीची उत्पादने भाड्याने दिल्यास चांगला नफा मिळतो, असे भासवून फिर्यादींना लिंक पाठवून लॉग-इन करण्यास सांगितले. जादा परताव्याच्या हव्यासापोटी फिर्यादींनी टप्प्याटप्प्याने ८७ लाख ५८ हजार रुपये विविध बँक खात्यांवर जमा केले. मात्र, मुद्दल अथवा परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिस निरीक्षक अमोल धस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading content, please wait...