
Summary
पुण्यातील सहकारनगरमध्ये निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने सुनेवर बळजबरीचा प्रयत्न केला.
मुलगा अपत्य प्राप्त करू शकत नाही हे माहित असूनही कुटुंबाने लपवून लग्न लावले.
सुनेने धाडस करून पोलिसांत तक्रार दिली, आरोपी सासरा, त्याची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल.
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना उडकीस आली आहे. एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर बळजबरी करुन शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने कशीबशी सुटका करुन घेत पोलिस स्टेशन गाठले. यानंतर कधीकाळी रक्षक म्हणून वावरणाऱ्या माजी सहाय्यक पोलिस आयुक्ताचा लंपट चेहरा समोर आला आहे.