पुणे : ६ कोटी रुपये किमतीची विविध क्रिप्टोकरन्सी जप्त

बीटकॉईन प्रकरण, दोन्ही आरोपींनी न्यायालयीन कोठडी
pune crime update Bitcoin cryptocurrencies worth Rs 6 crore seized
pune crime update Bitcoin cryptocurrencies worth Rs 6 crore seized sakal

पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सायबर तज्ज्ञांसह माजी आयपीएस अधिकाऱ्याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींकडून सहा कोटी रुपये किमतीची विविध क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेला सायबर तज्ञ पंकज प्रकाश घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी (ता.२५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर पाटील यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर पाटील याची पत्नी कांचन पाटील आणि भाऊ अमरनाथ पाटील यांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वतः: व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे सहा कोटी रुपये किमतीचे विविध क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आले आहेत. तसेच आणखी क्रिप्टोकरन्सी हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. आरोपींनी अपहार केलेल्या रक्कमेचा आणि त्यातून कमावलेल्या मालमत्तेचा शोध घेऊन ते जप्त करण्यात येत आहे. या गुन्ह्यात आरोपी विरोधात सक्षम पुरावे गोळा करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करायचे आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com