Pune Crime : कामधंदा कर सांगितल्याने मुलाने केला वडिलांचा खून

कामधंदा कर असे सतत सांगितल्याने मुलाने चिडून वडिलांचा खून केल्याची घटना आज पहाटे टिंगरेनगर येथे घडली
pune crime update son killed father over says do job insted of beging at home
pune crime update son killed father over says do job insted of beging at homesakal

विश्रांतवाडी : कामधंदा कर असे सतत सांगितल्याने मुलाने चिडून वडिलांचा खून केल्याची घटना आज पहाटे टिंगरेनगर येथे घडली. या घटनेत लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५ वर्षे रा. मास्टर कॉलनी, लेन न.१४-जे, टिंगरेनगर) यांचा खून त्यांचा मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे याने कात्रीचे वार करून केला.

या प्रकरणी मुलाचे मामा बाबु रामू दांडेकर (वय ३६ वर्षे , व्यवसाय- मजुरी, रा. मास्टर काँलनी, लेन न. १४-जे, टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवनाथ मंजुळे हा काही कामधंदा करत नसल्याने वडील त्यास कामधंदा करीत चल व आंघोळ करत जा, चांगला रहात चल, असे नेहमी बोलत असल्याने त्यांच राग मनात धरून दि,. १८ रोजी पहाटे १.३० आरोपीने घरातील कैचीने वडील लक्ष्मण मंजुळे यांच्या छातीत व पोटात मारून ठार मारले.

pune crime update son killed father over says do job insted of beging at home
Pune Crime : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक; दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त

तसेच आई त्यास सोडाविण्यासाठी गेली असता तिलासुद्धा हाताला कैचीने मारून जखमी केले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केले आहे. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले असून त्याच्या वर्तनातून तो मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज असून कोर्टाच्या आदेशानुसार त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास विश्रांवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे) भालचंद्र ढवळे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com