Pune Crime News : निविदा मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे देणारा ठेकेदार काळ्या यादीत

महापालिकेच्या प्रकल्प विभागाने निविदा रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
pune crime update to get tender gave false document fraud crime coep
pune crime update to get tender gave false document fraud crime coepesakal

Pune News : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला ध्वनीरोधक (साउंड बॅरियर्स) लावण्याच्या कामाची निविदा मिळविण्यासाठी मुंबईतील एका हॉटेलचा खोटा दाखला मिळविण्याचा प्रकार समोर आला.

त्यानंतर महापालिकेच्या प्रकल्प विभागाने निविदा रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे या कामाला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. मे. द. रायकॉन कन्स्ट्रक्शन असे काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.

पुणे महापालिकेने सीओईपी चौकात उड्डाणपूल बांधल्यानंतर या संस्थेतील विद्यार्थ्यांना वाहनांच्या आवाजाचा रात्र होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साउंड बॅरियर्स लावण्याची मागणी सीओईपीतर्फे करण्यात येत होती.

महापालिकेने यासाठी चालू अर्थसंकल्पात तरतूद केली, त्यानुसार फेब्रुवारी २०२३ मध्ये सुमारे ३ कोटी २० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली. यामध्ये द. रायकॉन कन्स्ट्रक्शनने निविदा भरताना अनुभवाचा दाखला म्हणून मुंबईतील एका हॉटेलचे पत्र सोडले.

निविदेचे ‘अ’ पाकिट उघडल्यानंतर या पत्राबाबत महापालिकेला संशय आल्याने संबंधित हॉटेलशी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्षात भेट घेऊन माहिती घेतली असता हॉटेलच्या कंपनीने ठेकेदाराला कोणतेही पत्र दिलेले नाही.

तसेच पत्रही महापालिकेला देण्यात आले. यानंतरही संबंधित ठेकेदाराने महापालिकेला आणखी एक खोटे पत्र देऊन पूर्वीचा दाखला कसा खरा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचीही खातरजमा करण्यात आल्यानंतर हे पत्रही खोटे असल्याचे समोर आले.

प्रकल्प विभागाने हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. यामध्ये महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याने विधी विभागाच्या सल्ल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

तसेच संबंधित हॉटेल कंपनीने देखील ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी कार्यालयीन परिपत्रक काढत मे. द. रायकॉन कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मे. द. रायकॉन कन्स्ट्रक्शनचे प्रमुख शक्ती दरेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वारंवार घडत आहेत प्रकार

महापालिकेचे काम मिळविण्यासाठी ठेकेदारांकडून खोटी कागदपत्र सादर करण्याचा प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वी जी २०च्या विविध कामाच्या निविदा, येरवडा येथील नदीवरील पुलाच्या कामाची निविदा, सॅनिटरी पॅड पुरविण्याची निविदा, संगणक खरेदी यासह इतर कामाच्या निविदेत खोटी कागदपत्र दिल्याने समोर आले आहे.

यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठेकेदारांना यासाठी मद करत आहेत. असे प्रकार लहान मोठ्या निविदेत घडत असल्याने असल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे, तसेच कामांचा खोळंबाही होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com