Pune Crime : अंध पतीला घातला नऊ लाख रुपयांचा 'गंडा'; पत्नी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman fraud

Pune Crime : अंध पतीला घातला नऊ लाख रुपयांचा 'गंडा'; पत्नी फरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अंध व्यक्तीशी लग्न करून नवरी आणि लग्न जमवून देणाऱ्यांनी नवऱ्यामुलाची नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सात महिने संसार केल्यानंतर पत्नीने घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: प्रसिद्धीसाठी कंगना रणौतचा वरचा मजला रिकामा - निलम गोऱ्हे

कैलासकुमार सिंघवी, सारिका बंब , नंदलाल बंब, कमलाबार्स बंब आणि राजु कोठारी यांच्यावर फसवणूक व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विनोद केसाराम चौधरी (वय 30, रा. रेशमा रिव्हेरा सोसायटी, विमाननगर) यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विनोद चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. ते रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करतात. अंध असल्याने त्यांचा विवाह जमण्यात अडचण येत होती.

हेही वाचा: मंदिर बांधण्यासाठी हिंदू संघटनेनं दलित, आदिवासींना कमी पैशात राबवलं

दरम्यान, त्यांच्या समाजातील मध्यस्थ कैलासकुमार सिंघवी यांच्यामार्फत त्यांना सारिका बंब हिचे स्थळ आले. मात्र विवाहासाठी मुलीच्या कुटूंबास पैसे द्यावे लागतील, असे सिंघवी याने फिर्यादी यांना सांगितले. त्यानूसार त्यांनी आरोपींना वेळोवेळी 8 लाख 73 हजार रुपये दिले. दरम्यान, सारिका हिने संसार करत असताना 33 हजार रुपयांचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. त्यानंतर विनोद यांनी तीच्याशी वारंवार फोनवर संपर्क साधला असता. तीने त्यांना परत येण्याचे आश्‍वासन दिले. मात्र नंतर तीने फोन बंद करुन ठेवला. तीचे आधारकार्ड तपासले असता तेही बनावट निघाले. जानेवारी 2021 ते जुलै 2021 दरम्यान ही घटना घडली.

loading image
go to top