esakal | फेसबुकवर बनावट खाते उघडून कंपनीची जाहिरात करण्यास भाग पाडले
sakal

बोलून बातमी शोधा

crime

फेसबुकवर बनावट खाते उघडून कंपनीची जाहिरात करण्यास भाग पाडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नोकरी देण्यासाठी एका तरुणीकडून दहा हजार रुपये घेण्यात आले. मात्र तिच्याकडून काम करून घेत नोकरी देण्यात आली नाही. तसेच बनावट तरुणीच्या नावे फेसबुक खाते खोलून त्यावरून कंपनीची जाहिरात करण्यास तरुणीला भाग पाडण्यात आले.

या प्रकरणी तरुणीने वारजे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित अर्जुन सुतार (वय २५, रा. देशमुखवाडी, शिवणे, मूळ रा. सांगली) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह इतर साथीदारांविरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. शिवणेतील दांगट इस्टेट लाईमलाईट ट्रेन्डस प्रा. लिमिटेड या कंपनीत आठ ते २२ मार्च दरम्यान हा प्रकार घडला.

हेही वाचा: काबूल विमानतळ बंद; देशाच्या सीमेवर अफगाण नागरिकांची झुंबड

सुतार आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी मिळून फिर्यादी तरुणीस कंपनीत नोकरी देण्यासाठी ऑनलाइन, फोन पे व रोख रक्कम अशी एकूण १० हजार रुपये भरायला लावले. त्यानंतर काही दिवस काम करून घेत त्याचा पगार आणि नोकरी दिली नाही. त्यामुळे फिर्यादीने आरोपींकडे दहा हजार रुपये परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी तीला कार्यालयाबाहेर न जाऊ देता तीला बसवून ठेवले. त्यानंतर दमदाटी करीत करून फिर्यादीला एका तरुणीच्या नावे बनावट फेसबुक खाते काढून दिले आणि त्यावरून कंपनीची जाहिरात करण्यास सांगून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करणे तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यांतील रक्कम जप्त करायची आहे. आरोपींनी अशाप्रकारे इतर मुलींची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास करायचा असल्याने अटक आरोपीस सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने आरोपीस तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

loading image
go to top