esakal | काबूल विमानतळ बंद; देशाच्या सीमेवर अफगाण नागरिकांची झुंबड
sakal

बोलून बातमी शोधा

Afgani people at border

काबूल विमानतळ बंद; देशाच्या सीमेवर अफगाण नागरिकांची झुंबड

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून नागरिकांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरु असून काबूल विमानतळ बंद झाल्यानं आता या नागरिकांची सीमेकडं झुंबड उडाली आहे. अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर आता इथले नागरिक सैरभैर झाले आहेत. बँकांमध्ये ठेवलेला आपला पैसा काढण्यासाठीही लोकांची एटीएमबाहेर बुधवारी मोठ्या रांगा लागल्याच्या पहायला मिळाल्या.

तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अद्याप इथं प्रशासकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळं इथंल्या नागरिकांना कशी मदत करता येईल याबाबत परदेशी दात्यांना कळेनासं झालं आहे. सोमवारी अमेरिकन सैन्यान पूर्णपणे माघार घेतल्यानंतर इस्लामी मिलिशियानं इथल्या बँका, रुग्णालये आणि सरकारी यंत्रणेवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

हेही वाचा: निर्बंध उठवण्यासाठी ठाकरे सरकारचा 'वाटाघाटीचा' नवा धंदा - शेलार

दरम्यान, अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणाखाली सुरु असेललं काबूल विमानतळ सध्या बंद झालं आहे. यानंतर आता भीतीच्या सावटाखाली असलेल्या अफगाण नागरिकांना देशाबाहेर काढण्यासाठी खासगीत प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी इराण, पाकिस्तान आणि मध्य आशियातील देशांच्या सीमावर्ती भागात त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाणं शोधली जात आहेत. त्यामुळं पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांताच्या सीमेवरील तोरखाम येथील दरवाजा उघडून पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक इथे जमा झाले आहेत, अशी माहिती एका पाकिस्तानी अधिकाऱ्यानं दिली आहे. तसेच अफगाणिस्तान-इराण सीमेवर इस्लाम काला बॉर्डर येथे हजारो अफगाण नागरिकांनी गर्दी केली आहे.

हेही वाचा: राज्यसरकारला सद्बुद्धी दे! राधाकृष्ण विखेंचे भगवतीला साकडे

१,२३,०० पेक्षा अधिक लोकांना अमेरिकेनं काबूलमधून एअरलिफ्ट केलं आहे. पण अद्यापही लाखो अफगाण नागरिक धोक्याच्या छायेखाली आहेत. युएन रेफ्युजी एजन्सी UNHCR नं गेल्या आठवड्यात म्हटलं की, सुमारे पाच लाख अफगाण नागरिकांचं या वर्षाच्या शेवटापर्यंत स्थलांतर झालेलं असेल.

loading image
go to top